विद्या-कला यांचे दैवत असलेल्या गजाननाची आराधना करताना इयत्ता सातवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष आवडीच्या विषयाच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या.
सादरीकरण, हस्तकला, भाषा, विज्ञान-तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र या मुख्य सहा विषयांवर आधारित उपविषय इयत्तावार निवडण्यात आले होते. त्यासाठी सर्व विभागातील अध्यापकांनी विषयातील निपुणतेनुसार त्या-त्या गटास मार्गदर्शन केले.