सिंधुताई:अनाथांची माई:- कवी गणेश आघाव|ग्रामवार्ता एक्सप्रेस
सिंधुताई सपकाळ या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला आहे.
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.
सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.
आपणाला ही आपले भाषण,व्याख्यान,कविता,कीर्तन,भारुड किंवा विविध कलाकृती यांचे माहिती, मनोरंजक व प्रबोधनपर व्हिडीओ प्रसारित करायचे असल्यास आम्हाला संपर्क करा: Contact/Whatsapp: 8788951178