डगरेकाकाची मासेमारी (कोकण)

Опубликовано: 02 Ноябрь 2024
на канале: Pragat Loke
435,447
3.3k

डगरेकाकाची मासेमारीDagarekakachi masemari
For Latest Update Follow me on INSTAGRAM:   / pragat.loke  
भारतातील कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भात शेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहे.
कोकणात शेती या व्यवसायाबरोबरच मासेमारी हाही एक महत्वाचा व्यवसाय आहे. कोकण किनारपट्टीवरील लोकांचा हा प्रमुख व्यवसाय म्हणून ओळखला जातो. कोकणाला लाभलेल्या विशाल समुद्रकिनाऱ्यामुळे येथे मासेमारी व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसून येतो.

कोकणात विविध प्रकारचे मासे आढळतात. येथील मच्छिमार साधारणपणे उन्हाळा व हिवाळा या ऋतूंमध्ये मासेमारी करतात. मान्सूनमध्ये तुलनेने कमी प्रमाणात मासेमारी केली जाते. कारण, मान्सूनमध्ये मासेमारी करणे धोकादायक असल्यामुळे बोटी दूरवर पाठवल्या जात नाहीत.त्याचप्रमाणे मन्सून हा माश्यांचा प्रजनन कालावधी असल्याने या काळात मासेमारीवर बंदी घालण्यात येते.

कोकणामध्ये सुरमई, बांगडा,पापलेट, घोळ, बोंबील असे विविध प्रकारचे मासे मिळतात. कोकणातील मासे अनेक ठिकाणी निर्यात केले जातात. त्यामुळे मासेमारी हे आज कोकणातील अनेक लोकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन बनले आहे.सुरमई, बांगडा,पापलेट, घोळ, बोंबील