जयभीम..!
आंबेडकरी चळवळीच्या वतीने या शहरात आपण अनेक ऐतिहासिक मोर्चे आंदोलने केली आहेत.चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या काळात कोरलेल्या अजिंठा, वेरूळ व शहरातील बुद्ध लेण्यांमुळे या जिल्ह्याची ओळख अधोरेखित झालेली आहेच परंतु पहिल्यांदाच जगभरातील बौद्ध बांधवांना/देशांना दि.07 रोजी होणाऱ्या बौद्धलेणी बचाव मोर्चातून आपण बौद्ध म्हणून परिचित होणार आहोत.
त्यामुळे हा मोर्चा शिस्त, संयम आणि एकजुटीची प्रचिती देणारा असला पहिजे. हा मोर्चा अत्यंत जबाबदारीने पार पाडण्याची काळजी व्यक्तिशः प्रत्येकाने घेतली पाहिजे.
या मोर्चाच्या नियोजनासाठी पक्ष, संघटना, वैचारिक मतभेद यास तिलांजली देऊन एकत्र आलेल्या लहान मोठया कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने परिश्रम घेत यशस्वी नियोजन केले आहेत परंतू केवळ आपल्या उपस्थितीनेच हा मोर्चा खऱ्या अर्थाने इतिहासात नोंद व्हावी असा होणार आहे.
त्यामुळे काही किरकोळ सूचना आपण अमलात आणल्यास मोर्चाचा अत्यंत सकारात्मक संदेश जगभरात आपण देऊ शकतो.
बौद्ध अनुयायी म्हणून हा मोर्चा भिक्खू संघाचे नेतृत्वाखाली आपल्या सर्वांच्या स्वाभिमानाची, अस्तित्वाची, अस्मितेची उंची जगावर कोरणार आहे.
■ नम्र सूचना
१) मोर्चात शांतता, शिस्तबद्धता, संयम, समन्वय ठेवावा.
२) अनावश्यक घोषणा न देता महापुरुषांचा गौरव करावा व फलकावरील मागण्यांचा उद्घोष करावा.
३) कुणाचीही अप्रतिष्ठा व वैयक्तिक उदात्तीकरण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४) शक्य होईल त्यांनी पांढरे वस्त्र परिधान करावे
५) केस मुंडन करून, अंगावर चित्रं काढून, अर्धनग्न अश्या वेशात मोर्चात सहभागी होणाऱ्यांना मज्जाव करावा.
६) भिक्खू संघ, लहान मुले, महिला व वृद्ध यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी त्यांना विना अडथळा चालता यावे व पिण्याचे पाणी मिळवून देण्यासाठी प्राधान्य द्यावे.
७) इतर धर्मियांना दुखावणाच्या घोषणा, गीते, सवांद , चित्रीकरण करू नये.
८) हा मोर्चा सर्वांचा असल्याने मोर्चातील सर्वांचा सन्मान राखावा, आपण बौद्ध अनुयायी म्हणूनच मोर्चात वावरावे कोणताही अविर्भाव बाळगू नये.
९) मोर्चाच्या अग्रभागी भिक्खू संघ त्यानंतर महिला व मुली जेष्ठ नागरिक व कार्यकर्ते व ठिकठिकाणी धम्मसेवक असतील.
१०) गोंधळ, गोंगाट, बेशिस्त व वरील सुचनांचे उल्लंघण करणाऱ्या सर्व घटकांना मोर्चाचा भाग म्हणून आपापल्या स्तरावर नम्र प्रतिबंध करावा.
चला तर मग या ऐतिहासिक मोर्चात सहभागी होऊ !
बुद्धलेणी आमच्या हक्काची,
एकजुटीने वाचवायची !
वरील सूचनांना आपली सहमती असल्यास शेअर करा अन्यथा दुर्लक्ष करावे.