बाबरवस्ती येथे ७ वी शिक्षण परिषद संपन्न
दि.३१/१/२०२३ ला आसंगीतुर्क केंद्राची शिक्षण परिषद बाबरवस्ती ( पांडोझरी)जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे आयोजित करण्यात आली होती. उपस्थित सर्व शिक्षक यांना विद्यार्थ्यांच्या हस्ते लेखन साहित्य व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
शिक्षण परिषदेच्या सुरूवातीला शिक्षणाची गंगा तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शिक्षण परिषदेत आसंगीतुर्क केंद्रातील वर्ग एक ते आठचे सर्व शाळांचे शिक्षक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे केंद्रप्रमुख रामचंद्र राठोड यांनी केले. त्यात त्यांनी शिक्षण परिषदेचा उद्देश समजावून सांगितला परिषदेत घ्यावयाचे विषय यांची कल्पना देण्यात आली शिक्षण परिषदेत केंद्रातील एकूण एकवीस शाळा सहभागी झाल्या होत्या.
प्रथम तासिका मोहन टोणे सर नी यांनी (NAS)नास आधारीत चाचणी १ बाबत चर्चा व नास चाचणी २ चे नियोजन याविषयी सविस्तर माहिती सांगितली .
द्वितीय तासिका दिलीप वाघमारे सर यांनी घेऊन यशोगाथा लेखन व सादरीकरण संदर्भात मार्गदर्शन केले उदाहरणासह समजावून सांगितले.
तसेच या पध्दतीने खालील तासिका मधिल विषय घेण्यात आली . SCERT कडील अध्ययन स्तर अभ्यास सर्वेक्षण नंतर विद्यार्थ्यांचे क्षमता वाढीसाठी शालेय स्तरावर करायच्या उपयोजना याबाबत चर्चात्मक सादरीकरण प्रत्येक शाळेतील एक प्रतिनिधी यांनी केले . इयत्ता पहिली दुसरी तिसरी व सहावी गुणवत्ता शोध परीक्षा मार्गदर्शन करण्यात आले .अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांकरिता उपचारात्मक अध्यापन याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले या साठी अभिजित माळगोंडे सर, सुनिल चव्हाण सर, नामदेव जाणकर सर विषय दिलें होतें
यावेळी केंद्रातील सर्व वरिष्ठ मुख्याध्यापक व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते
शेवटी केंद्रप्रमुख रामचंद्र राठोड यांनी दैनंदिन आढावा, शालेय गुणवत्ता याविषयी आढावा घेऊन शिक्षण परिषदेची सांगता झाली.