बाबरवस्ती येथे ७ वी शिक्षण परिषद संपन्न
दि.३१/१/२०२३ ला आसंगीतुर्क केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बाबरवस्ती(पांडोझरी) येथे आयोजित करण्यात आली होती. उपस्थित सर्व शिक्षक यांना विद्यार्थ्यांच्या हस्ते लेखन साहित्य देऊन स्वागत करण्यात आले.
शिक्षण परिषदेच्या सुरूवातीला शिक्षणाची गंगा तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शिक्षण परिषदेत आसंगीतुर्क केंद्रातील वर्ग एक ते आठचे सर्व शाळांचे शिक्षक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. रामचंद्र राठोड यांनी केले. त्यात त्यांनी शिक्षण परिषदेचा उद्देश समजावून सांगितला परिषदेत घ्यावयाचे विषय यांची कल्पना देण्यात आली शिक्षण परिषदेत केंद्रातील एकूण एकवीस शाळा सहभागी झाल्या होत्या.
शेवटी केंद्रप्रमुख रामचंद्र राठोड यांनी दैनंदिन आढावा, शालेय गुणवत्ता याविषयी आढावा घेऊन शिक्षण परिषदेची सांगता झाली.
केंद्रातील सर्व वरिष्ठ मुख्याध्यापक व मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते