आई थोर तुझे उपकार
आई थोर तुझे उपकार
करितो साष्टांग नमस्कार ।।
आभाळाला केला कागद, समुद्राची केली शाई
तरी तुझी महती लिहिता येणार नाही
आई थोर तुझे उपकार ।।
तू जन्माज्ञी , तू कष्टाळू
तूच मार्गदर्शिका व तूच गुरु
तू वृक्षाची सावली, तू जीवनाचा पाया
चिंतीते कल्याण,सिंचीते, घडविते जीवन महान
आई थोर तुझे उपकार ।।
तू तर थोरामोरांची जननी
करुणा , साहस अन त्यागाची मूर्ती
समर्पणाची बंदिनी
ना खोटे वात्सल्य, ना चेहर्यावर थकवा
तूच ती जिजाई घडवीला शिवा
तू निस्वार्थ प्रेमाची पुजारी
तुझ्या वाचून तीन्ही जगाचा स्वामी भिकारी
आई थोर तुझे उपकार ।।
तू कल्पतरू तू गुरुकिल्ली
तूच चारधाम, तूच पंढरीची वारी
आई थोर तुझे उपकार ।।
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई
वादळ वारे , ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई
आई थोर तुझे उपकार ।।
तू आहे तर मी
तू आहे तर हे जग
तू बलवान , सर्वकाही साध्य जिला
सलाम कर्तुत्वाला प्रणाम तुझ्या देवत्वाला
शतशः आभार देवाला त्याच्या अजोड निर्मितीला
करितो तुझ्या सुख समृद्धीची कल्पना
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आई थोर तुझे उपकार||
Hii , Guys Please Like , Share & Subscribe.
Nikhil Chadre
#mother #mothersday #happymothersday #mom #mother #love