तुझ्या श्वासात माझा जीव गुंतला ,
तुझ्या असण्याने जीव लागला
तु भेटण्याची आस धरून मनात ,
आपल्या नात्याचा मला ध्यास लाभला ....(१)
तू मला प्रेमाची व्याख्या दिली ,
जगण्याची दिशा आणि साथ निर्माण केली
तुझा हाथ हातात धरून चालताना ,
तुझ्या असण्याने मी तृप्त झाली ..... (२)
तुझे शब्द मनाला खूप भावले ,
स्वप्नांत सर्व क्षण मी तुझ्यासोबत जगले
तू कोरले आहे तुझे नाव मनावर ,
आयुष्भर मी तुझी सावली बनून राहिले .... (३)
तुझ्या मला भेटन्याने मी जिंकली
तुझी मायेची ऊब मनात भिनली ,
तुझी साथ माझ्या हृदयात कायम
तुझ्या स्पर्शाने माझी रात्र सजली .... (४)
By - क्षितिजा .