"चिखलदऱ्याचं गुपित ठिकाण 😍 | नंद उद्यान गणपती संग्रहालयातलं सौंदर्य पावसात खुललं!| एक मनमोहक अनुभव!"

Опубликовано: 13 Май 2026
на канале: CKRK Travel Life
1,558
107

#ganpati#ganpatibappamorya
Hello guys welcome back to our channel...........
CKRK Travel Life...........
विदर्भाचे नंदनवन असणाऱ्या चिखलदरा येथे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना चिखलदरा परिसरातच नंद गणपती संग्रहालय हे विविध ठिकाणच्या गणपतींचे सुंदर संग्रह आहे. चिखलदरा-परतवाडा रस्त्यावर मोथा गावाजवळ हे ठिकाण असून, हे ठिकाण चिखलदरा पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे. पर्यटक या ठिकाणी थांबून एकाच ठिकाणी 6000 हून अधिक गणपती मूर्तींचे सौंदर्य अनुभवण्यास प्राधान्य देतात
सतत ३० वर्ष मेहनत घेऊन अकोला येथील प्रदीप नंद आणि दीपाली नंद या दांपत्याने या संग्रहालयाची संकल्पना आखली व त्यांनी ते पूर्णत्वास आणले सुद्धा. प्रदीप नंद वडिलोपार्जित शेती व्यवसाया सोबतचं मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. हे सर्व सांभाळून त्यांनी अगदी लहानपणापासूनच गणपतीच्या विविध मूर्ती जमाकरण्याचा छंद जोपासला. लग्नानंतर प्रदीप नंद च्या छंदाला पत्नी दीपाली नंद यांची पण साथ मिळाली. घरामध्ये हजार ,दोन हजार गणपती जमा झाले. घरातील सर्वच खोल्यामध्ये ,शेतात ,मित्रांकडे सगळीकडे गणपती च गणपती जमा झाले. आई माधुरी नंद ,वडील मधुसूदन नंद यांनी प्रदीप ला वारंवार सांगितले इतके गणराया जपले आहेत तर यांचा कुठेतरी संग्रहालय बनव. लागलीच प्रदीप व दीपाली ने संग्रहालय साकारण्याचा निर्णय घेतला.
संपूर्ण भारतासह परदेशात जेथे कुठे वेगळ्या स्वरूपाचे गणपती मिळतील ते या दांपत्याने सातत्याने जमा केले. ३००० च्या वर गणपती जमा झाल्यावर या दोघांनी गणपती संग्रहालय साकारण्याचा निर्णय घेतला .चिखलदरा येथे नंद यांची बऱ्याच ठिकाणी जमीन असल्यामुले पर्यटकांना गणेश दर्शन होईल हा उद्देश ठेऊन घनदाट जंगल परिसरात , निसर्गाच्या कुशीत तीन एकर जागेत अतिशय सुंदर असे गणपती संग्रहालय २०२० मधे साकारण्यात आले . सुरवातीला या ठिकाणी तीनहजार गणपती होते . आता संग्रहालयात सुंदर ,रेखीव मुर्त्यांची संख्या सहाहजारा वर पोहोचली आहे.
विशेष बाब :-
जागातील पाहिले एकमेव संग्रहालय जेथे ६००० गणपती एकाच ठिकाणी विराजमान आहे
"नंद गणपती संग्रहालय चिखलदरा "
विशेष बाब म्हणजे चिखलदरा या पर्यटण स्थळी साकारलेल्या २५४४ गणपती मूर्ती संग्राहलयाची नोंद ‘इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस’ने घेतली आहे.
काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आणि गुजराथच्या किनाऱ्यापासून ते आसाम ,वाराणसी ,ओरिसा राजस्थान ,केरळ ,कर्नाटक बंगाल ,येथे असणाऱ्या विविध रूपातील गणपती बाप्पा इथे आहे आणि त्या या संग्रहालयात सुसज्जपणे मांडल्या आहेत . संग्रहालयात भारतातील विविध भागासह चीन.इंडोनेशिया ,नेपाळ ,भूतान ,थायलंड सिंगापूर सारख्या देश्यामध्ये असणाऱ्या विविध स्वरूपातील गणपतीच्या मूर्ती देखील आणण्यात आल्या काच ,माती,दगड,लाकूड ,फायबर अश्या विविध माध्यमात बनविलेल्या गणेश मूर्ती या संग्रहालयात पहायला मिळतात . गणपतीची नाणी , गणपतीची च्या चौसष्ठ कला, ते अगदी बाळ गणेशापासून पासून भव्यदिव्य स्वरूपातील गणपतीचे दर्शन या संग्रहालयात घडते . क्रिकेट ,हॉकी .कबड्डी ,बुद्धिबळ ,बॅडमिंटन ,टेबलटेनिस ,खोको ,वाहन चालवतांना , शेती काम काम करतांनाचे गणवेश देखील पर्यटकांना आकर्षित करतात . त्याच प्रमाणे विविध वाद्य वाजवतांनाचे गणपती , २६ हजार पेन्सिली पासून बनवलेले गणेश तर पर्यटकांना भारावून टाकतो
गवताच्या अतिशय बारीक पात्यावर होणाऱ्या गणरायाच्या दर्शनासह धान्याचे दाणे, खडू, मेणबत्त्या, तंतू यावर देखील मंगलमूर्तीचे दर्शन घडते. अगदी पानांपासून बनवलेल्या गणेशाच्या मूर्ती आहेत चांदी, पितळ, तांबे, लोखंड, काज, ग्रॅनाईट, लाकूड, फायबर, मोती, शिंपले, रुद्राक्ष इतकेच नव्हे तर पेन्सिल, साबण, शर्टची बटने अशा विविध वस्तूंवर अतिशय सूक्ष्म स्वरूपापासून ते सहा फूट उंचीपर्यंत असणाऱ्या सुखकर्त्याचे दर्शन मेळघाटात चिखलदरा लगत असणाऱ्या मोथा या ठिकाणी गणपती संग्रहालयात घडते. चिखलदरा येथे वर्षभर येणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी हे गणपती संग्रहालय खास पर्वणीच ठरत आहे
आपण गणेश फुटबॉल खेळताना, लॅपटॉपवर काम करताना आणि सायकल चालवताना देखील पाहू शकता. संपूर्ण संग्रहालय पाहण्यासाठी सुमारे दीड तास लागतो. संग्रहालयात ₹50 ची छोटीशी प्रवेश फी आहे जी त्याच्या देखभालीसाठी घेतली जाते. यात इंडोनेशिया, सिंगापूर आणि चीन सारख्या देशांतील क्युरेट केलेली शिल्पे देखील आहेत.
OUR INSPIRATION
@anujbucket @Distancebetweenbyshubh @KritikaGoel @TravelThirstyBlog @TravelingDesi

our other video links
01- Shivtirth water park Tourist Places :-    • Shivtirth Water Park 🏞️ || Shivtirth Water...  
02 - Uppar wardha dam morshi :-    • Live Update Uppar Wardha Dam Simbhora | Sh...  
03 - Shivtirth water park Tourist Saoner Nagpur V-1:-    • Shivtirth Water park Saoner Nagpur - Trailer  
04 - Yashwant Maharaj mandir :    • श्रीराम मंदिर अयोध्या Jr. CKRK  #shortsfee...  
05 - Nisarg wan paryatan kendra part 1 :    • निसर्ग वन पर्यटन केंद्र मोर्शी | भाग-१ | N...  
06 - Nisarg wan paryatan kendra part 2 :    • निसर्ग वन पर्यटन केंद्र मोर्शी भाग-२ |Natu...  
07 - Orange farm :    • ORANGE PROCESSING PLANT l SHRAMJIVI NAGPUR...  
08 - Ramoji film city :    • Ramoji film city/ramoji film city hyderaba...  
09 - Geedee car museum :    • Gedee car museum in Coimbatore | gedee car...  
10 - Nagpur Metro :    • Nagpur Metro I Orange line I माझी मेट्रो I...