श्री गजानन महाराज पालखी सोहळा शिरपूर जैन | Shri Gajanan Mauli palkhi , Shirpur jain

Опубликовано: 30 Сентябрь 2026
на канале: ExploreWithHrutik
612
12

सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव (shegaon) येथून पंढरपूर येथे जात असते. यंदाही पालखी 13 जून रोजी शेगाव येथून पंढरपूरसाठी (Pandharpur) प्रस्थान केला आहे दिंडीचे हे 55 वे वर्षे असून जवळपास सातशे वारकरी सहभागी आहेत , 250 पताकाधारी 250 टाळकरी 200 सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी पंढरपूर कडे प्रस्थान झाली आहे . तर पुढील पायी प्रवास करून 15 जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूर येथील आषाढी उत्सवात (Ashadhi Wari) हे सर्व वारकरी सामील होणार आहे.
२० जुन रोजी पालखीचे शिरपूर नगरीत आगमन झालेलं असून पालखी हि श्री संत जानगीर महाराज संस्थान शिरपूर येथे मुकाम्मी असणार व हि पालखी २१ ला सकाळी ५ वाजता शिरपूर वरून पुढे निघेल.

संपूर्ण महाराष्ट्रामधून श्री क्षेत्र पंढरपूरला बहूतेक सर्व संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे. भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा घडाव्यात आणि वारकरी सांप्रदायाच्या महान परंपरेची जपणूक व्हावी या उद्देशाने श्री गजानन महाराज संस्थानने १९६८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी व श्री क्षेत्र आळंदीला मोटारीने पालखी दिंडीसह नेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. याशिवाय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र पैठण, श्री क्षेत्र मुक्ताईनगर या ठिकाणी देखील संस्थानची वारी निमित्त पालखी जात आहे. आषाढी वारिकरीता पंढरपूरला जाताना वारकरी दरवर्षी सोबत निघतात. दिंडीमुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्त्वांचा लोकांना बोध होतो व आध्यात्मिक कार्य गतिमान होऊन धर्माप्रती श्रध्दा व भावना वृध्दिंगत होतात. तसेच लोकजीवनावर आध्यात्मिकतेचा प्रभाव पडण्यास मदत होते. दारिद्रय, अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी गावे पायी वारीच्या वाटेत आहेत. या गावांमध्ये हरीनामाचा प्रसार करून तेथील ग्रामस्थांचे जीवन (आयुष्य) सुखकर करणे, तेथील व्यसनाधिनता, अंधश्रध्दा दूर करणे हे या वारीमागचे आणखी एक कारण. संस्थानचे पायी वारीकरीता श्री महाराजांची चांदीची नवीन पालखी बनारस येथील कारागीर आणून तयार करून घेतली आहे. त्यावरील नक्षीकाम अत्यंत कलापूर्ण असून ही पालखी पाहाताक्षणीच अंत:करणातील भक्तिभाव उंचबळून येतात

श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूरला जातांना खालील तीर्थक्षेत्रावरून जाते.
श्री क्षेत्र नागझरी- श्री क्षेत्र डव्हा-श्री क्षेत्र शिरपूर जैन- श्री क्षेत्र नरसी नामदेव-श्री क्षेत्र औंढा नागनाथ-श्री क्षेत्र त्रीधारा- श्री क्षेत्र गंगाखेड- श्री क्षेत्र परळी वैजनाथ- श्री क्षेत्र अंबाजोगाई- श्री क्षेत्र तेर-श्री क्षेत्र तुळजापूर-श्री क्षेत्र सोलापूर- श्री क्षेत्र माचनुर- श्री क्षेत्र मंगळवेढा- श्री क्षेत्र पंढरपूर.

#शेगावतेपंढपूर #शेगावपालखी #संतगजाननमहाराज #गणगणगणातबोते #शिरपूरजैन #पालखीसोहळा #गजाननबाबा #जयगजानन #पंढरपूर #आषाडीएकादशी #गजाननमहाराजशेगाव #अनंतकोटी #ब्रह्मांडनायक #महाराजाधीराज #योगीराज #परब्रम्ह #संचितानंदभक्तप्रतिपालक #शेगावनिवासी #समर्थश्रीगजाननमहाराजकिजय