दुट्टप्पी उद्धवने धनुष्य बाण आणि शिवसेना गहाण ठेवली होती, ती मी सोडवली - एकनाथ शिंदे

Опубликовано: 04 Сентябрь 2026
на канале: Prime Marathi
6,860
22

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचे संकेत दिले आहेत. तसेच शिंदे गटाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले असले तरी चोर हा चोरच असतो. आमच्याकडेच खरे धनुष्यबाण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.

उद्धव ठाकरेंकडून सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. आपल्या पक्षाकडे असलेले कार्यकर्ते दुसरीकडे जाऊ नयेत म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था या स्वतंत्र यंत्रणा आहेत. या संस्थांवर अशा प्रकारचा आरोप केला जात नाही. यापुढेतरी तुमच्यात सुधारणा घडू द्या.

“कोणीतरी आम्हाला चोर म्हणालं. म्हणजे आम्ही ५० आमदार आमदार चोर १३ खासदार चोर, शेकड-हजारो नगरसेवक चोर, लाखो कार्यकर्ते शिवसैनिक चोर. म्हणजे तुम्ही लाखो लोकांना चोर ठरवत आहात. कधीतरी आत्मपरीक्षण करणार की नाही?” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच तुम्हाला सोडून गेलेले गुन्हेगार आणि तुम्ही बरोबर? हे कसे होऊ शकेल. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे,” असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

ताज्या घडामोडी, बातम्या आणि नवीन अपडेट्स साठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या -
ऍप डाउनलोड करा

Download App : https://instoriesplus.com/getapp?youtube
Prime Marathi : https://primemarathi.in
Facebook :   / primenewsmarathi  
Twitter :   / primenews_mh  

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.