संक्रांतीच्या आदल्यादिवशी येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात. या थंडीच्या दिवसांमध्ये अनेक प्रकारच्या शेंगभाज्या, पालेभाज्या, फळभाज्या मुबलक प्रमाणात पिकलेल्या असतात. त्यामुळे या सर्व भाज्यांना एका विशिष्ट पद्धतीने एकत्रित करून बनवलेल्या भाजीला भोगी असे म्हणतात . महाराष्ट्रातील मराठवाडा भागात भोगीच्या भाजीला खेंगाटची भाजी किंवा खेंगाट म्हणतात. भोगी बनवण्यासाठी सोलाणे म्हणजेच ओले हरभरे,वाटाणे, वाल, वांगी, बटाटा, कांदा, लसूण, शेंगदाणा, तिळाचे कूट, खोबराकीस, बोरं, गुळ यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. या व्यतिरिक्त शेवगा, गवार, पावटा, मेथी, चाकवत या भाज्यांचाही समावेश करण्याची पद्धत आहे. पारंपरिक पद्धतीने भोगी बनवताना खूप मसाल्यांचा वापर करू नये. सर्वसामान्य कुटुंबात सर्व प्रकारच्या भाज्या सहसा विकत घेऊन खाने परवडत नाही त्यामुळे सणाच्या निमित्ताने हा मेनू बनवला तर कुटुंबाच्या पोषणात भर पडू शकते असा शास्त्रोक्त विचार या भोगीच्या भाजी बद्दल आपण करायला हवा. तेव्हा मी असे म्हणेन "नक्की बनवा भोगी आणि राहा निरोगी".या व्हीडिओ मध्ये प्रात्येक्षिक रूपाने भोगीची भाजी बनवून दाखवली आहे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक असून प्रेरणादाई देखील आहेत. "फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी" च्या "एफएसटी ऑनलाईन/fstonline " या यू ट्यूब चॅनेलला आपण नक्की पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असे आवाहन.