लोकशाहीत मतदानाचं वेगळं महत्व आहे – देवेंद्र फडणवीस

Опубликовано: 12 Сентябрь 2026
на канале: Thane Post
116
2

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला मतदानाचं आवाहन केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात लोकशाहीचा महोत्सव सुरु आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. नागपुरात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. लोकशाहीत मतदानाचं वेगळं महत्व आहे. निवडून येणाऱ्या सरकारकडून लोकांना आशा, आकांक्षा, अपेक्षा असतात. या सर्व अपेक्षा पूर्ण होण्यासाठी मतदान करणं आवश्यक आहे. प्रत्येकालाच आपल्या सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. मतदान करणाऱ्यांना तो अधिक आहे. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.