THANE POST ! व्हायरल ऑडिओ, मुख्यंत्र्यांचा तीन वर्षांच्या चिमुरडीला फोन

Опубликовано: 15 Июль 2026
на канале: Thane Post
235
6

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत सर्वोच्च स्थान मिळालं आहे, याचंच एक उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका ऑडिओ क्लिपमधून पाहायला मिळतंय.

एका ३ वर्षांच्या चिमुरडीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या फोनची ऑडिओ क्लिप सोशल सध्या मीडियावर गाजत आहे.

विश्रांतीवाडी इथल्या विश्रांत सोसायटीत राहणाऱ्या अमोल आणि कांचन शिंदे यांच्या तीन वर्षांच्या अंशिका या मुलीने दारात उभं असणाऱ्या दूधवाल्या काकांना पैसे देण्याचा हट्ट केला. त्यावर तीची आई तिच्यावर प्रेमळपणे रागावली. उद्धव काकांचं म्हणणं तू ऐकत नाहीस का असं आईने अंशिकाला सांगितलं. हा व्हिडिओ अंशिकाच्या मामाने फेसबुकवर अपलोड केला. आणि बघता बघता अंशिकाचा हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला.

याची नोंद खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत मुख्यमंत्र्यांनी स्वत: फोन करत अंशिकाच्या आई-वडिलांशी संवाद साधला. मुख्यमंत्री आणि अंशिकाच्या प्रेमळ संवादाची ही ऑडिओ क्लिप युवासेनेच्या इन्स्टाग्राम पेजवर टाकण्यात आली आहे.